Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedउभ्या दुचाकीला ट्रॅक्टरने उडविले, दोघे गंभीर जखमी

उभ्या दुचाकीला ट्रॅक्टरने उडविले, दोघे गंभीर जखमी

कोहमारा-नवेगावबांध मुख्य मार्गावरील कोकणा/जमी. फाट्यावरील घटना 
गोंदिया : ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ डिसेंबरला दुपारी अंदाजे १२ वाजे दरम्यान कोहमारा ते नवेगाव/बांध मार्गावरील कोकणा/जमी.फाट्याजवळ घडली. गुलचंद्र वखारे (२२) व दिनेश कापगते (१९) दोन्ही राह. कोकणा/जमी. ता. सडक अर्जुनी अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर असे की, सदर व्यक्ती ही आपले दुचाकी घेऊन कोकणा/जमी. फाट्यावरील एका पानठेल्याजवळ थांबले असताना, कोहमारा कडून नवेगावबांध कडे जात असलेला ट्रॅक्टर क्र. एम.एच.३५ ए.जी.४९९५ वरील चालक लापरवाही व निष्काळजीपणे चालवून थांबलेल्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत दोन्ही इसम गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नवेगाव/बांध येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डूग्गीपार पोलीस ठाणे अंतर्गत ट्रॅक्टर चालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरील तपास पोलिस हवलदार गुणवंत कठाणे करीत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments