Sunday, June 8, 2025
Google search engine
HomeUncategorizedनवेगाव बांध पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवेगाव बांध पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमटिडीसीचे नवेगावबांध पर्यटक निवास, जिल्हा गोंदिया चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण
गोंदिया : विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामधे एमटिडीसीचे नवेगाव बांध पर्यटक निवास नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती शाश्वत रित्या उभारले असून ते पर्यटकांना पर्वनी ठरेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

नवेगाव बांध हे एक आदर्श पर्यटन स्थळ
22 नोंव्हेंबर, 1975 या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले हे घनदाट जंगल गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला असून गोंदियापासून 65 कि.मी. अंतरावर नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. वनश्रीने नटलेल्या या उद्यानाचा परिसर 165 चौ.कि.मी. आहे. येथील तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशाहून येणारे पक्षी विशिष्ट हंगामात दरवर्षी येतात. नवेगांव बांध हा तलाव सुमारे 11 वर्ग कि.मी. परिसरात पसरलेला आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे. या जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरु होऊन गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. असे म्हटले जाते की, हा जंगलप्रदेश हत्तींचा येण्या-जाण्याचा मार्ग होता व म्हणूनच नागझिरा अभयारण्यातील हत्तीखोदरा व नवेगांव अभयारण्यातील हत्तीपंगडी या ठिकाणांना तशा प्रकारची नावे मिळाली. नवेगाव बांध हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे, जिथे तुम्ही बोटिंग करू शकता, पक्षी निरीक्षण करू शकता आणि आसपासच्या जंगलातील विविध प्राणी पाहू शकता. येथील प्राचीन आणि शांत वातावरण पर्यटकांना निसर्गाच्या जवळ आणते.

सर्व सोयीसुविधा ने सज्ज पर्यटक निवास
नवेगावबांध या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरीता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून रु. 21.00 कोटीच्या निधीतुन उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. येथे VIP सूट, डीलक्स सूट, स्टॅंडर्ड सूट आणि 8 बेडेड डॉर्मिटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.येथे एकूण डिलक्स १८ सुट , लेडीज २ डॉरमेटरी सुट,जेन्ट्स डॉरमेटरी १ सूट,१ चेंजींग रूम,१ मॅनेजर रूम,१ वेटींग रूम आहे.

नवेगाव बांध पर्यटकांचे आकर्षण केंद्र.
इटियाडोह धरण हे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेला हा पाटबंधारे प्रकल्प मोरगांव अर्जुनी तालुक्यात आहे. कटला मासा व कोळंबीसाठी हा प्रकल्प प्रसिध्द आहे. तिबेटिया कारपेट बनविण्याचे केंद्र येथून जवळच आहे. तिबेटी कॅम्प, गोठांगाव हे मोरगांव अर्जूनी तालुक्यातील नवेगांव बांधजवळून 10 कि.मी. अंतरावर व प्रतापगड तिर्थस्थळापासून 3 कि.मी. अंतरावर जगप्रसिध्द मोठा जलाशय आहे. येथे तिबेटी व बंगाली लोकांचे कॅम्प आहे.

नागझीरा अभयारण्याचे क्षेत्रफळ 152.81 चौ.कि.मी. असून यामध्ये सस्तन प्राण्यांच्या 34 प्रजाती, पक्ष्यांच्या 166 प्रजाती तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 34 प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलात प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी पक्षी आढळतात. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्टया महत्वाची सुमारे 200 प्रकारचे वृक्ष तसेच पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी अभयारण्यामध्ये एक वस्तू संग्रहालय आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments