देवरी नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार
गोंदिया : देवरी शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल एवढे पाणी उपलब्ध असताना केवळ नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी नागरिकांना सलग तीन दिवसांपासून नळाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, येथील जनप्रतिनीधी व अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. देवरी शहरात घरा – घरात लावलेल्या नळ योजनेचे पाणी सलग तीन दिवसांपासून आले नसल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. पाणीपुरवठा सभापती आपल्या कामातच व्यस्त असल्याने अधिकाºयांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही तर नगराध्यक्ष देखील गप्प बसले आहेत. देवरी शहराला नगरपंचायतमार्फत सार्वजनिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तब्बल 10 वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असताना शहराला नळ योजना मंजूर झाली होती. शिरपुर धरन प्रकल्पातील पाणीपुरवठा होऊन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पण नगरपंचायत असतानांही सतत विकाश कामाच्या नावावर पाईप लिकेज चे कारने समोर करत दोन – दोन दिवस शहरातील नागरीकांनी पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सदर जलवाहिनी जागोजागी फुटत असल्यामुळे दर आठ दिवसाला पाणी पुरवठा खंडित होतो. नगरपंचायत केवळ तात्पुरती दुरुस्ती करून मोकळे होते. कायमस्वरूपी जलवाहिनीचे काम केले जात नाही. परिणामी शहरात प्रभाग क्रमाकं 12 ,13 व 14 या भागात पाणी पुरवठा कमी प्रमानात होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायतीत अधिकाºयांवर कोणचाच वचक राहिलेला नाही तर पाणी पुरवठा सभापती स्वत:च्या कामात मग्न असल्याने शहरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार कोरोटे यांनी लक्ष देण्याची मागणी
देवरी शहराला दररोज सतत दोन तास नळाला पाणीपुरवठा करता येईल एवढे मुबलक पाणी शिरपुर धरनात उपलब्ध असताना नागरिकांना रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नगरपंचायतच्या नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आमदार सहेसराम कोरोटे यांनी लक्ष देण्याची मागणी शहरवासियांतून केली जात आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219