सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त राहिल्याने 11 ग्रामपंचायतीना महात्मा गांधी यांचा सिल्वर पुतळा
पहिल्या वर्षी टीबी मुक्त राहिल्याने 19 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा कास्य पुतळा
गोंदिया : 24 मार्च 2025 ला जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत वर्ष 2024 करीता सडक अर्जुनी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींना ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’प्रदान करण्यात आले.सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त राहिल्याने 11 ग्रामपंचायतीना महात्मा गांधी यांचा सिल्वर पुतळा व पहिल्या वर्षी टीबी मुक्त राहिल्याने 19 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा कास्य पुतळा व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटिल यांनी दिली आहे.
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा दि.24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन पोवार बिल्डींग,कन्हारटोली येथे संपन्न झाला.दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एका संकल्पनेवर एक भर दिला जातो.जागतिक क्षयरोग दिन दि.24 मार्च 2025 यंदाची थीम “Yes, We Can End TB” (होय, आपण क्षयरोग निश्चितपणे संपवू शकतो.प्रतिज्ञा करा, तरतूद करा सेवा द्या) अशी आहे.या संकल्पनेनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटिल यांनी यांनी दिली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेशजी हर्षे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांचे सह सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,गोंदिया तालुका खंड विकास अधिकारी गौतम,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,मोरगावअर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार, डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात ,पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्राँझ करिता 19 ग्रामपंचायत व सिल्व्हर मेडल करीता 11 ग्रामपंचायत पात्र ठरल्या त्या ग्राम पंचायतिला मेडल आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सडक अर्जुनी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींना ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’
RELATED ARTICLES






