धान विक्रीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करावी

0
242

गोंदिया : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी पणन हंगाम  2024-25 मधील धान विक्रीकरीता BEAM पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि.30 एप्रिल 2025 पर्यंत करण्याकरीता शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता आवश्यक त्या कागदपत्रासह (रब्बी पणन हंगाम 2024-25 चा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन 7/12 उतारा व नमुना 8, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी) तालुक्यातील नजीकच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर जावून शासनाकडून दिलेल्या कालावधीत म्हणजेच दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत धान विक्रीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोंदिया यांचेमार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here