गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “पँलिटिव्ह केअर” कार्यक्रम गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.जिल्ह्यात एप्रिल 2024 पासुन सुरु झालेला आहे. सद्य स्थितीत मार्च पासुन जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. भर उन्हाळ्यात ह्या कार्यक्रमामुळे 116 रुग्णांना तेथील उपचारामुळे जिवनाला आधार मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी दिली आहे.
पॉलिटिव्ह केअर हा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे.या कार्यक्रम अंतर्गत दीर्घ मुदतीच्या व गंभीर आजारांचे रुग्णांचे योग्य ती देखभाल घेण्याबाबत प्रशिक्षण व तांत्रिक माहिती क्षेत्रीय कार्यकर्ता तसेच रुग्णांचे कुटुंबीयांना देण्यात येत आहे. भर उन्हाळ्यात ह्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील के.टी.एस.रुग्णालयातील पॉलिटिव्ह केअर कार्यक्रम अंतर्गत डॉ.गोपिका शाहु व स्टाफ नर्स निधी मिश्रा यांच्या पथकाने जिल्ह्यातील ग्रामिण रुग्णालय व गावपातळीवर जुनाट आजारी रुग्ण की जे अंथरुणावर खिळलेले असतात अशा 46 गृहभेटी दरम्यान घरांना भेटि देवुन 116 रुग्णांना भेटि देवुन रुग्णांना,त्यांच्या नातेवाईकांना,कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांना देखभाल घेण्याबाबत प्रशिक्षण व तांत्रिक माहिती दिलेली असल्याची माहीती अंससर्गजन्य कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी दिली आहे.
भर उन्हाळ्यात माहे मार्च मध्ये 17 घरांतील 40 रुग्णांना तर एप्रिल मध्ये 12 घरांतील 35 रुग्णांना तसेच 21 मे पर्यंत 17 घरांतील 41 रुग्ण असे एकुण 46 घरातील 116 रुग्णांना पॉलिटिव्ह केअर कार्यक्रम अंतर्गत कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा देण्यात आल्याची माहीती डॉ.गोपिका शाहु यांनी दिली आहे.
दि. 17 एप्रिल रोजी कुडवा 1 कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा देताना डॉ.गोपिका शाहु व स्टाफ नर्स निधी मिश्रा तेथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.नेहा टेंभरे, आरोग्य सेविका वर्षा बामलकर व प्रिती कटरे, आशा सेविका गायत्री ठाकरे व मिरा उपवंशी.
पॉलिटिव्ह केअर म्हणजे काय ?
रुग्ण दीर्घ काळापासून किंवा मोठ्या आजारांमुळे आजारी असतो उदा.कॅन्सर,एच.आय.व्ही.,कुष्ठरोग,गुंतागुंतीचा क्षयरोग,हृदयासंबधी जुने आजार,श्वसनाचे आजार,किडनी विकार,लकवा मारणे,लिव्हर खराब होणे,वयोदृद्ध रुग्ण,मतिबंद मुले,फिट किंवा आकडी,कुपोषित मुले,थॅलेसेमिया,सिकलसेल,जास्त आजारी नवजात बाळ इत्यादी अशा रुग्णांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कुटुंबीय तसेच रुग्ण यांचे जीवनमान सुधारण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन घेतलेली संपूर्ण काळजी म्हणजेच रुग्णांची शारीरिक,मानसिक सामाजिक व आधुनिक गरज पूर्ण करणे की ज्यामुळे रुग्ण आपले आयुष्य आरामाने व आदराने जगू शकतो.
भर उन्हाळ्यात 116 लोकांना दिली “पँलिटिव्ह केअर” सेवा
RELATED ARTICLES






