देवरी आमगाव मार्गाला २ वर्षांतच तडे आणि खड्डे

0
173

गोंदिया : देवरी आमगाव राज्य महामार्गावर ३६ किलोमीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम २०२२-२३ या वर्षात पूर्ण झाले. अल्पावधीतच या बांधकामाची गुणवत्ता उघड झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व लोकप्रतिनिधी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
देवरी आमगाव दुतर्फा सिमेंट रस्ता व शहरात सिमेंट नाली बांधकाम करण्यात आले. महामार्गावर खड्डे व भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर आशंका व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया यांनी बांधकामाची गुणवत्ता तपासणी न करता गुणवत्ता धाब्यावर बसवून काम केल्याची चर्चा आहे. बांधकाम सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार यांच्याशी साटेलोटे करून कामे झाल्याचे चर्चा आहे. दोन वर्षातच सिमेंट रस्त्यावर कामाची निकृष्ट गुणवत्ता दिसून येत असल्याने नवीन रस्ता बांधकाम दोन वर्षात खड्डयात रुपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाकडे अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा असूनसुद्धा बांधकाम सुरू असताना बांधकामांची गुणवत्ता तपासण्याची वेळच मिळाली नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here