प्रतिबंधित 70 किलो पॉलीथीन जप्त, शहर पोलिसांची कार्रवाई

0
310

गोंदिया : शहरातील जैन कुशल भवनजवळ हात ठेलावर आठ ते दहा पांढ्यया पोत्यात प्लॉस्टीक पन्नीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेली पॉलीथीन घेवून जात असल्याची माहिती गोंदिया शहर पोलीसांना मिळाली. त्याप्रमाणे गोंदिया शहर डी.बी. पथकातील अंमलदार यांनी पो.नि. किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात त्याठीकाणी जावून पाहणी केली. यात एक इसम हा हातठेल्यावर 9 पांढ्यया पोत्यात शासनाने प्रतिबंधीत केलेली अंदाजित 36 हजार रुपये किमतीची 70 किलो प्लॉस्टीक पन्नी घेवून जाताना मिळुन आला. ही कारवाई 9 जून रोजी करण्यात आली.
ही पॉलीथीन शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाही कामी जप्त करण्यात आली. सदर मालाबाबत चौकशी केली असता शैलू राजेंद्र असाटी रा. सब्जी मंडी इसरका मार्केट गोंदिया यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मिळुन आलेली पॉलीथीन ही शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाहीबाबत नगर परिषद गोंदिया येथे माहिती दिली देण्यात आली. नगर परिषदचे स्वच्छता विभाग प्रमुख नितीन बोरखडे यांनी पोलीस ठाण्यात येवून शैलू राजेंद्र असाटी याच्याकडुन 10 जून 2025 रोजी 5000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. तरी, शासनाने प्रतिबंधीत केलेली पॉलीथीन कोणी विक्री करतांनी आढळुन आल्यास यापुढे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल . ही कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सतीश शेंडे , सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते,अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे , सोनु नागपुरे, राकेश बंजारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here