Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोलिसांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या करणे गरजेचे : डॉ.पुरुषोत्तम पटले

पोलिसांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या करणे गरजेचे : डॉ.पुरुषोत्तम पटले

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात केली पोलीसांची आरोग्य तपासणी
गोंदिया : कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना,गुन्ह्यांचा तपास,आंदोलने,मोर्चे,व्हीआयपीचे दौरे, नक्षलविरोधी गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते.या कारणाने त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही.समाजासाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांसाठी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आले.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन 17 मे च्या अनुषंगाने एनसीडी जनजागृती अभियान अंतर्गत दि. 17 मे 2025 ते 16 जून 2025 पर्यंत संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणुन दि.16 जुन रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ स्नेहा वंजारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तपासणी शिबिर संपन्न झाले.या शिबिरात सुमारे ८० पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या रक्तदाब (BP) आणि साखरेची (Sugar) तपासणी करण्यात आली.
जिल्हा पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच काही आरोग्य समस्या असतील तर त्याचे वेळीच निदान व ईलाज होऊन जिल्हातील पोलीस बांधवानी अधिक समक्षपणे कर्तव्य करावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत नेहमीच विवीध आरोग्य विषयक उपक्रम घेत असतात.
या शिबिरात फिजिओथेरपिस्ट डॉ.कांचन भोयर यांनी व्यायामाचे महत्त्व, आरोग्यदायी आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनम जाधव यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला.तसेच, ऑडिओमेट्री असिस्टंट प्रणोती सहारे यांनी कानाशी संबंधित आजारांची माहिती देऊन जनजागृती केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक सिंगनजुडे यांनी आपल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना नियमित तपासणी व औषधोपचार घेण्याचे मार्गदर्शन केले तसेच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग व प्राणायाम करण्याचे मार्गदर्शन केले. गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व  कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्याविषयी अधिक सजग होण्याचे आश्वासन दिले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्टाफ नर्स आरती लिल्हारे, गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स.पो.नि.कुडमते, पोलीस उपनिरीक्षक येरमे ,पोलीस उपनिरीक्षक खारकर, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांचे सहाय्य लाभले
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो.अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते.जागरण,अवेळी जेवण यामुळे अनेक व्याधी जडू शकतात.पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पोलीसांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या नियमित वेळेत करणे गरजेचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments