गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्याच्या पथकाने खामखुर्रा येथील जंगल परिसरात तासपत्तीचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली. या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम व तासपत्ती असा एकूण २८ हजार ६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कैलास खासबागे व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे. आरोपी मोतीलाल कौशील, अविनाश नंदेश्वर, मुलचंद वाघाडे, लवकुश शेवता, कमलेश कुंजाम, इतवारी वाघाडे, राजपाल उईके व बाळकृष्ण शहारे सर्व राह.खामखुर्रा ता. देवरी हे १६ जून रोजी दुपारी ३:०० वाजता खामखुर्रा परिसरात पत्ते खेळत असताना पोलिसांनी पकडले. त्यांच्या अंग झळतीतून आणि स्थळावरून १४ नग मोबाईल किंमत १८ हजार तासपत्ती व रोख १० हजार ५० रुपये एकूण २८ हजार ६५ रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा अनन्वे गुन्हा दाखल केला.
जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES