गोंदिया : तक्रारदार उमेश रहांगडाले रा. पालडोंगरी ता. तिरोडा यांनी पोलीस ठाणे तिरोडा येथे तक्रार दिली कि १९ जून २०२५ चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी मौजा पालडोंगरी येथील त्यांचे शेतातून इंडोफार्म कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर किंमती. ५,५०,०००/-रु. चा माल चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पो. ठाणे तिरोडा येथे २० जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना २० जून २०२५ रोजी पथकास गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की, आरोपी हे ट्रैक्टर चोरी करून मौजा कवलेवाडा दिशेने गेले आहेत तसेच तांत्रीक माहीती माहितीच्या आधारे नामे राकेश मुरलीधर राहांगडाले वय-३९ वर्ष, रा. घरसंसार सोसायटी, नविननगर, पारडी, नागपूर यास ताब्यात घेण्यात आले व त्यास चोरीस गेलेल्या द्रक्टर बाबत विचारपूस करण्यात आली असता त्याने सांगीतले की, तो त्याचे दोन साथीदार नामे सुधाकर धनराज कटरे व कृष्णा चैतराम आंबाडारे दोन्ही रा. येरली तालुका तुमसर जि.भंडारा यांच्यासह १९/०६/२०१५ रोजी मौजा बघोली (परसवाडा) येथे नातेवाईकाकडे जेवण करणेकरीता गेले होते व परत जात असताना मौज पालडोंगरी गावाचा बाहेर शेतात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करून तुमसर येथे घेऊन गेले असे सांगीतल्याने व गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांचे ताब्यातून अंदाजे कि. ५,५०,000/- रु एक इंडोफार्म कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली अंदाजे कि. ७०,००० /- रु होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटर सायकल असा एकूण किंमती. ६,२०,०००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे. वरील नमूद तिन्ही आरोपीतांना पोलीस ठाणे तिरोडा यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तिरोडा पोलीस करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पोउपनि. वनिता सायकर अंमलदार इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, दीक्षितकुमार दमाहे , चापोशी राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे.
ट्रॅक्टर चोरी करणा-या आरोपींचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी
RELATED ARTICLES