Tuesday, June 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedडिएमओ यांची प्राथमिक आरोग्य केंद्र तिल्ली मोहगाव व चोपा येथे आकस्मिक भेट

डिएमओ यांची प्राथमिक आरोग्य केंद्र तिल्ली मोहगाव व चोपा येथे आकस्मिक भेट

गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रान्वये जिल्हा व तालुका स्तरिय अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थाना भेटी देवुन तेथील स्वच्छता व सुरक्षा,औषध उपलब्धता,वैद्यकीय सुविधा,रुग्णांसमवेत सुसवांद याबाबत निर्देशकांची पाहणी करण्याच्या सुचना दिल्यात.त्या अनुशंगाने दि.21 जुन रोजी जिल्हा हिवताप अधिकारी तथा गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी एकाच दिवशी दोन पीएचसी त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तिल्ली मोहगाव व चोपा येथे आकस्मिक भेटी देवुन कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत हिवताप विभाग कार्यालयातील पर्यवेक्षक सोबत होते.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र तिल्ली मोहगाव व चोपा येथील प्रसुतीगृह,प्रयोगशाळा, आंतररुग्ण वार्ड,औषधी साठा,लस साठवणुक केंद्र ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकारि यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा,हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी.कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे,जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे,कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण करुन आवश्यक आहार देणे,टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी मार्फत योग्य नियोजन करणे,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,पत्ता सिजन स्थलातंरित लोकांची आरडीके किट ने मलेरिया बाबत तपासणी करणे,सद्य स्थितीत सुरु असलेला फवारणी कार्यक्रम अंतर्गत गुणवतापुर्ण फवारणी करुन पर्यवेक्षण करणे,अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी व आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बाबत विविध सुचना दिल्यात. भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांचेसह आरोग्य संस्थेतील संपुर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments