Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedआमगाव पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांची विल्हेवाट

आमगाव पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांची विल्हेवाट

गोंदिया : आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या वाहनांची विल्हेवाट करण्यात येणार असल्याची माहिती देवरी येथील उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी दिली आहे. वाहन क्रमांक MH 35-H7811 हिरो होंडा स्पेंडर बाइक सिल्व्हर कलर, MH 35-D7182 सुझुकी मॅक्स-१००, MH 31-BX 5324 स्टार सिटी, PURPLE COLOUR SCOOTY हिरो मिस इंडिया, BYCYCLE हिरो जेट या वाहनांची विल्हेवाट करण्यात येणार आहे.
उपरोक्त वाहनांचे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 मधील कलम 458 अन्वये विल्हेवाट लावावयाची असल्याने यासंबंधात ज्यांना उजर किंवा आक्षेप असल्यास अथवा मालकी हक्क असल्यास त्यांनी दिनांक 10 जुलै 2025 पर्यंत या कार्यालयास लेखी कळवावे. त्यानंतर आलेल्या आक्षेप/हरकतीचा/मालकी हक्काचा विचार केल्या जाणार नाही. तसेच विल्हेवाट झाल्यावर जी रक्कम येईल ती महसुल विभाग यांच्या खजिना मध्ये भरणा करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments