गोंदिया तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत 15 जुलै रोजी

0
206

गोंदिया : गोंदिया तालुक्यातील एकुण 110 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण (सन 2025 ते सन 2030) सोडत कार्यक्रम जाहीर झालेला असुन आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती गोंदिया सभागृहात घेण्यात येणार आहे. तरी याव्दारे संबंधित नागरिकांनी सरपंच पद आरक्षण सोडत कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार गोंदिया यांनी केले आहे.

अ.क्र प्रवर्ग एकुण पदे 50% महिला आरक्षण
1 अनुसूचित जाती 13 06
2 अनुसूचित जमाती 11 06
3 ना.मा.प्र. 30 15
4 खुला 56 28
एकुण 110 55

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here