कोब्रा सापासोबत स्टंटबाजी जीवावर बेतली; 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
242

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात कोब्रा सापासोबत स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. कोब्रा सापासोबत स्टंटबाजी करताना साप चावल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात ही घटना घडली आहे. लक्की बागडे (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे घोगरा या गावात कुंभरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच लक्की बागडे साप पकडायला गेला. मात्र, साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना देखील लक्की बागडे या तरुणाने स्टंटबाजीसाठी तो साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोब्रा सापाने त्याच्या हाताला दंश केला. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. दरम्यान, साप चावल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here