गोंदिया : येथील पोलीस मुख्यालय कारंजा येथे बाँब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, मोटर परिवहन विभाग आणि हिरवळ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.पर्यावरण ही काळाची गरज लक्षात घेऊन पर्यावरणाला अधिक हरित करण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, आंबा, चिकू , फणस, गुलमोहर, इत्यादी यांसारख्या देशी वृक्षांचा रोपण करण्यात आले.सदरचे वृक्षारोपण पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. शेवते, पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी पो.नि.प्रवीण मुंडे, रा.पो.नि.राजेश सरोदे, श्वान पथकचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक सतीश सिरिया, मोटर परिवहन विभाग येथील पर्यवेक्षक चंद्रशेखर कटरे आणि बाँब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, मोटर परिवहन विभाग येथील पोलीस अंमलदार यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून वृक्षारोपण केले.वृक्षारोपण कार्यक्रमात हिरवळ बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दीपक परमार, प्रताप आसवानी, हेमंत पटेल, पीनल पटेल, राहुल राठौड़, मनोज निर्मल, मंगेश तिडके, सुमित गुप्ता, सुप्रीत बैंस,सौरभ गौतम, छत्रपाल शहारे आणि संपूर्ण हिरवळ बहुउद्देशीय संस्थेच्या टीमचे मोलाचे असे सहकार्य लाभले.
पोलीस विभाग व हिरवळ संस्थेच्यावतीने वृक्षारोपण
RELATED ARTICLES






