शिक्षक समितीच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार बडोले यांच्या हस्ते वृक्षारोपण
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना 22 जुलै 1962 ला झाली असुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारी संघटना म्हणुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने 63 वर्षात स्वतःची ओळख निर्माण केली करीत कौतुकास्पद कार्य केल्याचा उल्लेख आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी केले.
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन निमित्ताने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कोहमारा येथे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,बाजार समितीचे सभापती डाॅ.अविनाश काशिवार,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण चौव्हाण,माजी उपनगराध्यक्ष वंदना किशोर डोंगरवार, शिवाजी गहाणे,रमेश चुर्हे,रजनी गिऱ्हेपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने वृक्षारोपण करून सर्वांना शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले. प्रस्ताविकेतून विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग तथा गोंदिया जिल्हा प्राथ.शिक्षक सह पत संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी शिक्षक समितीच्या कार्याची आठवण करून देत रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,शैक्षणिक साहित्यकिट वाटप,आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्त्यांना मदत सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष श्री किशोर डोंगरवार, तालुकाध्यक्ष जीवन म्हशाखेत्री , तालुका सरचिटणीस रतन कुमार रणवीर , माजी तालुका सरचिटणीस महेश कवरे , आनंद मेश्राम, नरेश मेश्राम, सुभाष हरिनखेडे,भाष्कर नागपुरे, अरविंद कापगते ,नंदू भाऊ वैद्य , मनोज मेश्राम, पुरुषोत्तम नेवारे , वाय एच काशीवर , महेश शरनगात , जितू काशीवार, गणेश शिंगणजुडे ,पारसनाथ कोरे, माणिक बेंदवार , प्रकाश कापगते , जयंत रंगारी , रवींद्र मारवाडे , टी एम मानकर , अरुण वैद्य , टी एस राऊत , सीबी गोबाळे , अश्विन राऊत , अमित झोडे,सागर राणे, रजनीश मेश्राम, लालदास भजणे बांगरे ताई आरोग्य सेविका,सर केके देशपांडे, जे बी कऱ्हाडे, पी. एन बडोले, डी पी पर्वते यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद : आ.राजकुमार बडोले
RELATED ARTICLES






