नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन : माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम
गोंदिया : माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन, गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नविन प्रशासकीय इमारत येथे विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावर मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि सभापती जिल्हा परिषद डॉ. लक्ष्मणराव भगत यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर व सभापती भगत यांचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शना भेट देऊन सरकारच्या विकासाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर व सभापती भगत यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सर्वांना प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंदीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांची प्रदर्शनाला भेट
विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला आज आमदार विनोद अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत उपस्थित होते.






