Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबध्द, वाशिम कारागृहात डांबले

कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबध्द, वाशिम कारागृहात डांबले

गोंदिया : जिल्ह्यात सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दल खबरदारी घेवून आवश्यक उपाययोजना करीत आहेत. या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यानुरूप शहरातील कुडवा येथील सराईत गुन्हेगारावर MPDA एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी २८ ऑगस्ट रोजी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्या सराईत गुन्हेगाराला वर्षभरासाठी वाशिम येथील कारागृहात डांबण्यात येणार आहे. संदेश मधुकर खोब्रागड़े (४५) रा.कुडवा असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे की, पोलीस स्टेशन रामनगर हद्दद्दीतील धोकादायक गुंड इसम नामे- संदेश मधुकर खोब्रागड़े, वय ४५ वर्ष, रा कुडवा हा पोलीस ठाणे रामनगर व गोंदिया शहर अंतर्गत हददीमध्ये शरीराविरुध्द, मालमत्ते विरुध्द, शासकीय लोकसेवकवर हमला करणे तसेच अवैध शस्त्र बाळगणे बाबतचे गुन्हे करीत असल्याने सदर इसमांविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर व गोंदिया शहर येथे विविध प्रकारच्या १२ गंभीर गुन्ह्याची नोंद आहेत.

सदर कुख्यात गुंड इसम हा रात्री- अपरात्री आपल्या हातामध्ये घातक हत्यारे, शस्त्रे घेवुन पोलीस ठाणे रामनगर व गोंदिया शहर हद्दीतील गरीब कामगार, सर्वसामान्य नागरीक, सर्वसामान्य व्यवसायिक तसेच व्यापारी यांना हत्याराचा धाक दाखवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्यामुळे या भागातील नागरीक भयग्रस्त झाले असल्याने त्यांना आपले दैनंदिन कामकाज करणे सुध्दा भितीदायक झाले होते. त्याचे असे कृत्यामुळे , मोहल्यातील नागरिकांना त्याचेपासुन धोका निर्माण झाला होता. तसेच त्याचे विरोधात गेल्यास तो आपल्याला धमकावुन जिवानीशी ठार मारेल अशी भिती सुध्दा त्यांचे मनात निर्माण करुन त्याने रामनगर पोलीस स्टेशन परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. त्याचेवर वारंवार गुन्हे नोंद तसेच प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्याचेवर कोणताच बदल झाला नसल्याने त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली होती. त्याचेविरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा भंग करून स्थानबध्द इसम हा पुन्हा गुन्हे करीत होता. यावरून त्यास प्रचलित कायदयाची कोणतीही भिती नसल्याचे दिसुन येत होते. तसेच पोलीसांनी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कायदेशिर कारवाईचा सकारात्मक परीणाम स्थानबध्द इसमाचे वर्तणुकीत झाला नव्हता. उलट दिवसागणित त्याचे अवैध कृत्ये वाढत चाललेली होते. त्यामुळे कलम ३ (१) महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती, अवैध वाळु तस्करी करणारे तसेच अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्ती, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालविणार्‍या आणि मानवी अपव्यापार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारीत २०१५) नुसार मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साो. गोंदिया. यांचेकडे ‘धोकादायक व्यक्ती’ अन्वये MPDA एका वर्षाकरीता स्थानबध्दतेचा आदेश होणेस प्रस्ताव पाठविला असता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. प्रजित नायर, सा. यांनी इसम नामे- संदेश मधुकर खोब्रागड़े, वय ४५ वर्ष, रा कुडवा जिल्हा- गोंदिया यास आदेश क्र. अ . का. गृह /४९३/२०२५ दिनांक २८/०८/२०२५ रोजी चे आदेशान्वये मध्यवर्ती कारागृह वाशीम , जिल्हा वाशीम येथे स्थानबध्दतेत ठेवण्याचे आदेश निर्गमीत झाल्याने सदर इसमास मध्यवर्ती कारागृह वाशीम कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया, गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया साहिल झरकर यांचे निर्देशाप्रमाणे स्था. गु. शा. गोंदिया चे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे प्रमुख मार्गदर्शखाली पोलीस ठाणे रामनगर पोलीस निरिक्षक प्रवीण बोरकुटे , स्थानिक गुन्हे शाखा गोदिया येथील प्रतिबंधक सेलचे म.पो. उप. नी. वनिता सायकर, अंमलदार पो.हवा. प्रकाश गायधने, छगन विठ्ठले, संतोष केदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्या. तिरोडा येथील अंमलदार लितेश गोस्वामी , पो. ठाणे रामनगर पोउपनि अमोल वाघमोडे , पोहवा राजेश भगत, पोहवा राजेश घरडे, पोहवा राजू पाचे यांनी कार्यवाही पार पाडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments