Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedओबीसींचा सरकारला ‘इशारा’, शासन निर्णयाची केली होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ओबीसींचा सरकारला ‘इशारा’, शासन निर्णयाची केली होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाचा तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी बुधवारी (ता. ३) सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सरकारला इशारा’ आंदोलन केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने एकवटलेल्या समाजबांधवांनी शासनाच्या २ सप्टेंबरच्या परिपत्रकाचीही होळी केली.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय रद्द करावा, हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काढलेला हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. पुन्हा सरकारने सगेसोयरेंच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचे काम केले आहे. असा आरोप करीत आेबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंविधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत, याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावा, असा मागणीवजा इशारा सकल ओबीसी समाज व ओबीसी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे. त्यानंतर आंदोलकांनी शासनाने काढलेल्या २ सष्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली. आंदोलनात ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, अशोक लंजे,कैलास भेलावे,जिल्हा बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर,दुर्गाप्रसाद ठाकरे,ओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जि.प.माजी सभापती संजय टेंभरे,टिकाराम भेंडारकर, गोवर्धन बोपचे,ओबीसी सेवा संघ आमगावचे भूमेश शेंडे, मनोज हरीणखेडे,पवार प्रगतीशिल मंचचे माजी अध्यक्ष एड.पृथ्वीराज चव्हाण, प्रमोद गुडधे, नरेश परिहार,पंचायत समिती सदस्य अजाबराव रिनायत,ओबीसी सेवा संघ गोंंदिया व वेगळ्या विदर्भ समितीचे सी.पी. बिसेन,ओबीसी संघर्ष समिती सडक अर्जुनीचे अध्यक्ष दिनेश हुकरे,माजी सरपंच माधवराव तरोणे, राजकुमार लाडसे, देवानंद कुकडे,राजुभाऊ ब्राम्हणकर, तुळशिदास शिवणकर, महेंद्र बिसेन, रमेश मेंढे, गिरीधारी हत्तीमारे, लोकचंद कापगते, मोहन भेंडारकर,सर्ववर्गीय कलार समाज संघटनेचे धमेंद्र डोहरे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव व ओबीसी अधिकार मंच सालेकसा सयोंजक प्रभाकर दोनोडे,ओबीसी संघर्ष समिती गोंदियाचे सुनील पटले,राजेश नागरीकर,मोहसीन खान,सईम कुरेशी, सरपंच संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, ओमप्रकाश लांजेवार, रवींद्र तुरकर, मुनेश्वर कुकडे, नरेश चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, गौरव बिसने,देवचंद बिसेन,ओबीसी संघर्ष समिती सालेकसा तालुकाध्यक्ष मनोज डोये, किशोर कोरे, कमल हटवार, हेमंत बिसेन, राकेश पाटील,जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पटले,जिल्हा परिषद सदस्य संशेद्र भगत,सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक अरुण पारधी,माजी पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे,गोंदिया ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष मनोज मेंढे,इर्रीचे माजी उपसरपंच रवी तरोणे,ओबीसी संघर्ष समितीच्या पुष्पा खोटेले,महात्मा फुले समता परिषद महिला आघाडी प्रमुख गायत्री इरले,माजी नगरपरिषद सभापती बंटी पंचबुद्धे,बहुजन युवा मंचचे सुनील भोंगाडे, रवी भांडारकर,गोंदिया शहर भाजप मंडळ अध्यक्ष ऋषिकांत साहू,बाजार समितीचे संचालक उपसभापती राजकुमार पटले,संचालक धनलाल ठाकरे,भटक्या विमुक्त जाती संघर्ष वाहिनीचे परेश दुरुगकर, तिरथ येटरे, भागचंद रहागंडाले,बहुजन समाज पक्षाचे सुनिल भरणे,बालू वंजारी, गिरधारी हत्तीमारे, लोकचंद कापगते, प्रकाश काशीवार,ओम पारधी,चंद्रकांत भोयर,अनिल कोरे,तुकाराम राणे,हिमालय येळे यांच्यासह सकल ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अन्यथा तीव्र आंदोलन
शासनाने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास याला विरोध म्हणून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आेबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.येत्या ७ सप्टेंबरला गोंदियात आंदोलनाला घेऊन येथील ग्रीन लॅंड सभागृहात दुपारी १२ वाजता बैैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments