आजी माजी सैनिकांचा सत्कार ही गौरवाची बाब : लायकराम भेंडारकर

0
136

गोंदिया: अर्जुनी-मोरगांव तालुक्यातील बोंडगावदेवी जि.प.क्षेत्र आपली मातृभुमी व कर्मभुमी आहे. त्यातच बोंडगावदेवी हे गाव अत्यंत धार्मिक व सामाजिक गांव आहे.गंगा जमुना माताचे पवित्र स्थान असल्याने या गावची महती सर्वदुर पर्यंत आहे.अशा या पावन गावात दहा दिवस सार्वजनीक बाल गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात विविध उपक्रमासह राबविल्या जातो.गणेश मंडळाने आयोजीत केलेला आजी,माजी सैनिकांचा जाहीर सत्कार ही गौरवाची बाब असुन देशाभिमान जागृत झाल्याची भावना निर्माण झाली आहे. तिर्थक्षेत्र बोंडगावदेवी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपन कुठलीही कसर ठेवणार नाही असे प्रतिपादन बोंडगावदेवी क्षेत्राचे जि.प.सदस्य तथा गोंदिया जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

सार्वजनिक बालगणेशोत्सव मंडळ बोंडगाव देवी च्या वतीने भारतीय सैनिक तसेच वीरांगणांचा सत्कार समारंभ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ता.3 विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानावरून लायकराम भेंडारकर बोलत होते.

यावेळी भारतीय सैनिक व माजी सैनिक डाकराम पुस्तोळे ( तलाठी ),पवन ठाकरे,जितेंद्र शेंडे, राजाराम नेवारे,चरणदास चवरे ( सिआरपीएफ) ,त्रीवेणी शहारे,कापगते,झलके,यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रतिमा बोरकर सरपंच, देवलाल मानकर, धम्मपाल वालदे शा.व्य.स.अध्यक्ष, अनिल मानकर, मंगलाताई रामटेके पोलीस पाटील, राधेश्याम झोळे माजी सरपंच, अमरचंद ठवरे ग्रा. स., कुसन झोळे, पतिराम मेश्राम, माया मेश्राम ग्रा. स., शिवकुमार जी मेश्राम, चेतनाताई रामटेके, ललिता बोरकर, संजय गिरीपुंजे, दीपक नेवारे, मनोज लांजेवार ,शांतीप्रकाश भैसारे, डाकराम पुस्तोडे माजी सैनिक तथा तलाठी, पवन ठाकरे माजी सैनिक, जितेंद्र शेंडे माजी सैनिक, राजाराम नेवारे माजी सैनिक, चरणदास चवरे सीआरपीएफ, त्रिवेणी शहारे, कापगते सर मुख्याध्यापक, भूमिका गोंधळे, ममता बरैया, मानापुरे मॅडम मुख्याध्यापक, लता मेश्राम ,उषा लोणारे तसेच इतर मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल तथा जि.प.प्राथमिक शाळेतील मुलामुलींनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे कैलास घावळे, दिलीप बोरकर, योगेश बारस्कर, ईश्वर बोरकर, नासिक बोरकर, दिनेश परशुरामकर, पंकज पर्वते, नीलकंठ राऊत, हिरामण ठाकरे, दिनेश नेवारे, नानेश्वर मेश्राम, संतोष मेश्राम, प्रकाश भैसारे, विनोद पाऊलझगडे, रामदास शहारे, राजेश बोरकर, नारायण बोरकर, दीपक बोरकर, तिलक घावळे, जयंत ठवरे, शुभम बोरकर, विश्वास लोणारे, रवी बनपूरकर, राजेश झोडे, राहुल मानकर, एस बोरकर, धर्माजी ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here