Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपालकमंत्री बाबासाहेब पाटील तीन दिवस जिल्ह्याचे दौऱ्यावर

पालकमंत्री बाबासाहेब पाटील तीन दिवस जिल्ह्याचे दौऱ्यावर

गोंदिया : राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे दिनांक 11, 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता हैद्राबाद येथून बिरसी विमानतळ गोंदियाकडे विमानाने प्रयाण. दुपारी 1.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन. दुपारी 2 वाजता बिरसी विमानतळ येथून शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, गोंदिया नवीन इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11 वाजता नियोजन भवन गोंदिया येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक. दुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता नियोजन भवन गोंदिया येथे डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा. नंतर शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. शनिवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमासाठी राखीव. सकाळी 11.40 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून बिरसी विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.50 वाजता बिरसी विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.50 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथून शमशाबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबादकडे विमानाने प्रयाण करतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments