तांडाटोला शाळेचे दोन शिक्षक निलबिंत

0
1047

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये शिक्षक उशीरा येत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी शाळा सुरु होण्याच्या वेळेआधीच आकस्मिक भेट देण्यास सुरवात केली. त्यातच २६ सप्टेंबरला गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तांडाटोला येथील शाळेला भेट देत वेळेवर शाळेत हजर न झालेल्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षिकेला निलबिंत केल्याने शिक्षक वर्गात चांगलीच खळबळ माजली आहे.निलबिंत करण्यात आलेल्या मध्ये यु.यु.उके,प्रभारी मुख्याध्यापक व श्रीमती कौशल्या लिखन कटरे, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तांडाटोला पंचायत समिती,गोंदिया यांचा समावेश आहे.तर याच पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या एका शाळेचे व आमगाव तालुक्यातील एका शाळेचे शिक्षक सुध्दा निलबंनाच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सविस्तर असे की, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी आज(दि.२६)सकाळी १०.३० वाजता आकस्मिक भेट दिली असता सदर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु.यु.उके व सहाय्यक शिक्षिका कौशल्या कटरे हे अनाधिकृत गैरहजर असल्याचे दिसुन आले.तसेच त्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचा अर्ज सादर न केल्याचे दिसुन आल्याने आपल्या पदाच्या कर्तव्यात कसूर केल्याचे कारण देत जिल्हा परिषद सेवा नियमांचा भंग केल्याने शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने तात्काळ प्रभावाने दिनांक २६/०९/२०२५ पासुन निलंबीत करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे.निलबिंत काळात यु.यु.उके यांना पंचायत समिती अर्जुनी मोरगाव तर श्रीमती कौशल्या कटरे यांना पंचायत समिती गोरेगाव येथे हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here