गोंदिया : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व विकासवादी धोरणांना प्रभावित होवून सालेकसा नगर पंचायत क्षेत्रातील हल्बीटोला येथील सौ. रत्नमाला ललित किरसान, सौ.रुक्माताई नाईक, सौ.शशिकला तरोने, ललित किरसान, संतोष कोरे, तोमेश्वर किरसान यांनी माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेशामुळे नगर परिषद क्षेत्रात पक्षाचे संघटन मजबूत होईल. सर्वांना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार राजेंद्रजी जैन, जिल्हा महासचिव डॉ. हिरालाल साठवणे, डॉ . माधुरी नासरे, सालेकसा शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका युवक अध्यक्ष बाजीराव तरोने, सुरेश कुंभरे सहित अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






