गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, गोरेगाव येथे गोरेगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार राजकुमारजी बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पक्ष संघटनेची सध्याची स्थिती, नगरपंचायत निवडणुकीची तयारी, निवडणुकांमध्ये पक्षाने घ्यायची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, युवा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पक्षाची ताकद एकवटून उभी राहील, असा निर्धार या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस खा प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली कामे करणारा पक्ष हा विकासाभिमुख, शेतकरी-शेतमजूरांच्या हिताचा पक्ष आहे. समाजकारणातून राजकारण ह्या राष्ट्रवादीच्या ब्रिदाप्रमाणे गोरेगाव नगरपंचायतीत कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करावा. आगामी नगरपंचायत निवडणुका या पक्षाच्या बळकटीसाठी निर्णायक ठरणार आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर काम केल्यास व जनहिताच्या कार्यांची माहिती जनतेला दिल्यास गोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकणार आहे.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, केवल बघेले, कृष्णकुमार बिसेन, आर डी कटरे, योगेश चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, श्रद्धाताई रहांगडाले, अनिताताई तुरकर, पन्नालाल बोपचे, भूपेश गौतम, गेंदलाल शेवटे, खुशाल वैद्य, रंजित तुरकर, सुशांत बोपचे, राजू पारधी, प्रतीक पारधी, धनलाल पारधी, घनेश्वर तिरेले, ओमप्रकाश ठाकूर, कैलास वाघाडे, रुस्तम येडे, रामभाऊ अगडे, प्रमोद जैन, डुमेश्वर पटले, रघुपती अगडे, शिला पारधी, नितेश येल्ले, उषाताई रामटेके, सुषमा अगडे, डिलेश्वरी वाघाडे, कल्पना शेवटे, सुनील कापसे, भुनेश्वर किरसान, धनराज रामटेके, नादिरा चूलपार, रंजू अगडे, रीना अगडे, मनीष धमगाये, अमन कटरे, सुनीता बिसेन, अर्चना चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक ताकदीने लढणार : माजी आमदार जैन
RELATED ARTICLES






