गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक १ ते ७ च्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रभाग १ ते ७ मधील मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद निवडणुकीची तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करतांना गोंदिया शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नातून गोंदिया मेडिकल कॉलेज, बिरसी विमानतळावरून नियमित विमान सेवा, तसेच अनेक द्रुतगती रेल्वे गाड्यांचे थांबे मिळाल्याने शहराच्या विकासात मोठी झेप मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे गोंदिया शहराला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांनी सदैव विकासाला प्राधान्य दिले असून, स्वच्छ, सुंदर आणि प्रगत गोंदिया निर्माण करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर हीच आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले यासाठी आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी उमेदवारांना साथ द्यावी. आमदार श्री राजकुमार बडोले म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारा व विकासाचे धोरण असून आगामी निवडणूकीमध्ये कोणत्याही संभ्रमात न राहता आपण सर्वांनी पक्षानी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहायचे आहे. या दरम्यान खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील माजी नगरसेवक श्री कल्लू यादव, माजी नगर सेवक श्री दिलीप गोपलानी, माजी नगरसेविका सौ, मौसमी सोनछात्रा, श्रीमती राखी भारद्वाज, श्री गुणवंत लांजेवार, सौ. धनिशा कटरे, श्री नारद सिन्हा, श्री विनोद मानकर, श्री विवेक मडावी, श्री दिनेश सोनवाने, श्री मनोज उरकुडे यांनी आपल्या समर्थकांसह माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आमदार श्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाला लाभ मिळणार असून पक्षाची ताकद वाढणार आहे. सर्व प्रवेशीतांचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, राजकुमार बडोले, नानू मुदलियार, बाळकृष्ण पटले, माधुरी नासरे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, लव धोटे , अनुज जयस्वाल, रवी पटले, मयुर जडेजा, निरज उपवंशी, कुंदा दोनोडे, आनंद ठाकूर, टी एम पटले, खालिद पठाण, झनकलाल ढेकवार, जोली पटेल, विनायक शर्मा, पुष्पलता माने, संजीव राय, अमित भालेराव, विनायक खैरे, मिनू बग्गा, विजय रगडे, रवी रामटेकरकर, एकनाथ वहिले, राज शुक्ला, शारदा पटले, लता रहांगडाले, आशीष ठाकरे, सुदर्शना वर्मा, नेहा बहेलिया, राकेश वर्मा, भीमदास तांडेकर, सुरेश पटले, लखन बहेलिया, संदीप पटले, शब्बीर शेख, नागो बनसोड, इरफान शेख, जुनेद शेख, कमल टांग, दीपक कनोजे, अजित देशमुख, रमेश गौतम, मोहन पटले, धनिशा कटरे, रवि सपाटे, राजा जैन, सुनील पटले, शैलेश वासनिक, गौरव नागपुरे, सुनील कावड़े, विक्रम बहेलिया, श्रेयस खोब्रागडे, मंगेश रंगारी, ओमेंद्र गजभिये, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
गोंदिया शहराचा विकास, स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी साथ द्या : माजी आमदार राजेंद्र जैन
RELATED ARTICLES






