गोंदिया : अगदी लहान गावापासून तर राजधानी पर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात घरभाडे भत्ता भेटत असताना ग्रामीण भागातील 90 टक्के कर्मचारी जवळच्या शहरातून ये-जा करतात. अन् पूर्ण घरभाडे भत्ता वसूल करतात. त्यातही अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे असूनही घरभाडे भत्ता वसूल करतात.
ग्रामीण भागात कार्यरत कर्मचारी म्हणजे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, लाईनमन, बँक कर्मचारी यापैकी बहुतांश कर्मचारी ये-जा करतात. कधी कधी तर यातून दोन तीन वेळाच यांचे दर्शन काहींना होतात. म्हणजेच सर्वत्र आनंदी आनंदच. त्यामुळे जनतेला यांचे दर्शन घेण्यासाठी तालुका, जिल्हा पतळीवर राहत असलेल्या ठिकाणी जाऊन कामे करून घ्यावी लागतात. मिटींच्या नावाचा अनेकजण उपयोग घेऊन आपली पोळी भाजून घेत असल्याचेही दिसून येते. यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकाना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ येते. ज्यांच्या सहीचे रहिवासी दाखले घेतल्या जातात तेच ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने इतरांनाही रहीवासी दाखले सहजरित्या मिळतात. अन् सर्व काही सुव्यवस्थितपार पाडतात. ग्रामीण भागातील जनतेला अगदी लहान सहान कामाला पदरचा पैसा, वेळ, श्रम खर्च करून जावे लागतात. महिन्याकाठी लाखोंचे पगार घेणारे कर्मचरी आपण जनतेचे काम करतो, अशा अर्विभावात हे कर्मचारी वागतात. यावर स्थानिक नेत्यांची कामे हे कर्मचारी सहजरित्या करतात. त्यामुळे त्यांची तक्रार कुठल्याच पातळीवर होत नसल्याचे आता नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे जनप्रतिनिधींनाही समस्याच वाटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच या ढेपाळलेल्या कारभारा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कानटोचणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यालयी गैरहजेरी, मात्र घरभाडे भत्ता पूर्ण
RELATED ARTICLES






