गोंंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगरपंचायतीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज(दि.१६)चांगलीच गर्दी दिसून आली.आज रविवारला 4 स्थानिक स्वराज्य संस्थेकरीता नगरसेवकर पदाकरीता 263 व नगराध्यक्ष पदाकरीता 15 अर्ज दाखल झाले.यामध्ये गोंदिया नगरपरिषदेकरीता अध्यक्षपदाकरीता 4 तर नगरसेवकपदाकरीता 147,तिरोडा नगरपरिषद नगराध्यक्षकरीता 2, नगरसेवक पदाकरीता 40, सालेकसा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरीता 4 नगरसेवक पदाकरीता 32 व गोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरीता 3 व नगरसेवक पदाकरीता 44 अर्ज दाखल झाले आहेत.
राकाँ,काँग्रेस व भाजपचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरणार अर्जगोंदिया नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाकरीता उद्या सोमवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा व नगरसेवकांचे अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात मिरवणुक काढत भरण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे भाजप व काँग्रेसच्यावतीनेही मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहे. भाजप नेते डाॅ.प्रशांत कटरे यांनीही उमेदवारी न मिळाल्याने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज सादर करण्याची तयारी सुरु केली असून ते सुध्दा उद्या मिरवणूक काढून अर्ज सादर करणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात रविवारी नगराध्यक्षपदाकरिता 15 तर नगरसेवाकरिता 263 अर्ज दाखल
RELATED ARTICLES






