गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे नाव निश्चित केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सचिन गोविंद शेंडे यांना गोंदिया नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शेंडे हे उद्या संभावित सर्व नगरसेवक उमेदवारासोबत मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाने गोंदिया नगरपरिषदेकरीता गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष व महिला अर्बन बँकेच्या संचालिका प्रा. माधुरी नासरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात प्रा.नासरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडून आमदार विनोद अग्रवाल व डाॅ. परिणय फुके यांचे खास मर्जीतले असलेले माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर आम आदमी पार्टीकडून उमेश दमाहे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच भाजपचे जेष्ठ नेते राहिलेले डाॅ.प्रशांत कटरे हे सुध्दा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते अपक्ष रिगंणात उतरतात की एखाद्या पक्षाचे उमेदवार ठरतात याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे शेंडे, राकाँच्या प्रा. नासरे तर भाजपचे जायस्वाल व आपचे दमाहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
RELATED ARTICLES






