Sunday, April 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

गोंदिया. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषीत केला असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांना विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबवून आवाहन करण्यात आले असून मतदारांचा सहभाग वाढावा याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहे.
निवडणुकीची मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय, शांततामय वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक 1 डिसेंबर 2025 रोजी पोहचणार असून त्यांच्याजवळ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर सर्व संवेदनशील साहित्य राहणार आहेत. त्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून गोंदिया जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 क्र.22 ची कलम 37 (1) (3) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागु करण्यात आले आहे.
मात्र, मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिक ठिकाणी आठवडी बाजार आयोजित करण्यात येत असतो, त्यामुळे मतदानाच्या दिवशी नागरीकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (अ) व (क) (सुधारित अधिनियम 1 नोहेंबर 2012) अंतर्गत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये नगरपरिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या दिवशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्हयातील गोंदिया, गोरेगाव, तिरोडा व सालेकसा या तालुक्यातील नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात आयोजित करण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायद्यातील तरतूदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments