1 कोटी रुपयांची फसवणुक करणारी अंतरराज्यीय टोळीचा फरार मुख्य आरोपी राजेश नायर जेरबंद

0
314

गोंदिया : आमगांव येथील फिर्यादी विरेंद्रकुममार राधेश्याम लिल्हारे वय ४५ वर्ष यांची २३ सप्टेंबर २०२५ रोजी १६.०० वा. च्या सुमारास आरोपी राजेश नायर व त्याचे साथीदार यांनी मिळून गोंदिया येथे १ कोटी रुपयाचा फसवणूक केले होते. सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी गुन्हयातील ३ आरोपीना २५ सप्टेंबर २०२५ रोजी छिंदवाडा मध्यप्रदेश येथून अटक केले होते. परंतु सदर आंतरराज्यीय फसवणुक करणारी टोळीचा प्रमुख आरोपी राजेश नायर गुन्हयातील ०१ कोटी रुपये घेऊन घटना तारखेपासुन पसार झालेला होता. सदर मुख्य आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पथक अहोरात्र करीत होते.

सदर फरार आरोपीचा शोध श्री पुरूषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील अधिकारी/अंमलदार हे करीत असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की आरोपी राजेश नायर हा दिनांक २९/११/२०२५ रोजी स्वतःच्या अटकपूर्व जामीनाकरीता गोंदिया येथे येणार आहे. सदर प्राप्त खात्रीशिर माहीतीच्या आधारे आरोपी राजेश नायर याचा गोंदिया येथे स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया चे पथक शोध घेत असता आरोपी राजेश नायर वय ४८ वर्ष रा. चांदनाका, शारदा मंदीर जवळ, छिंदवाडा हा दुर्गा भैय्या पोहेवाले च्या समोर रोडवर दिसुन आल्याने सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी पो.स्टे. गोदिया शहर यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई  श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी दिलेले निर्देश सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरूषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार राजु मिश्रा, पो.हवा. संजय चव्हाण, पो.हवा. दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. महेश मेहर, पो.शि. राम खंडारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here