दोडके/जांभडीच्या जंगलात वाघाने केले इसमाला ठार

0
185

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव वनविभाग व पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोडके जांभाडी सहवनक्षेत्रातील कॉम्पार्टमेंट क्रमांक 661 मध्ये आज शनिवार (दि.29) ला जांभाडी येथील रहिवासी कनसु छाननु उइके (वय 73) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व गोरेगाव पोलिसानी तत्काळ घटनास्थळ गाठुन पाहणी केली. सहा. पोलीस निरिक्षक प्रशांत भुते, हवालदार राष्ट्रपाल तुमडाम, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले यांनी मृतकाच्या कुटुंबाला वनविभागात नोकरीची संधी व तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here