Sunday, April 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोंदियाच्या प्रभाग क्रं.3 (ब),11 (ब) व 16 (अ) नगरसेवकांच्या निवडणुका स्थगित

गोंदियाच्या प्रभाग क्रं.3 (ब),11 (ब) व 16 (अ) नगरसेवकांच्या निवडणुका स्थगित

गोंदिया : गोंदिया नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं. ३ (ब), प्रभाक क्रं. ११ (ब) व प्रभाग क्रं. १६ (अ) मधील नगरसेवकांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहे. उर्वरीत निवडणुका मात्र २ डिसेबरलाच होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम बदलण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार, यापूर्वी 2 डिसेंबर 2025 रोजी होणारं मतदान आता पुढे ढकलण्यात आलं आहे. मतदानानाची नवी तारीख 20 डिसेंबर 2025 असून, मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्य निवडणूक आयोगानं शनिवारी (30 नोव्हेंबर) रात्री उशिरा जाहीर केली आहे.

 

निवडणूक पुढे का ढकलली?

गोंदिया नगरपरिषदेच्या ३ प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक पुढे ढकलण्यामागे काही महत्त्वाच्या कारणांचा समावेश आहे. यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले वाद, नव्यानं दाखल झालेले उमेदवारी अर्ज, अपील दाखल करण्याची प्रलंबित मुदत अशा कारणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच प्रभाग क्रमांक 3 (ब), प्रभाग क्र. ११ (ब) आणि १६ (अ) या तीन प्रभागांतील निवडणुक प्रकियेला घेऊन उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यामुळे आदेशानुसार स्थगित करण्यात आल्या. या सर्व बाबींचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments