Monday, December 22, 2025
Google search engine
HomeUncategorized'जय श्रीराम'' 'जय हनुमान'च्या घोषणांनी दुमदुमून शहर, हनुमंत कथेला प्रारंभ

‘जय श्रीराम” ‘जय हनुमान’च्या घोषणांनी दुमदुमून शहर, हनुमंत कथेला प्रारंभ

गोंदिया. डी.बी. सायन्स महाविद्यालय, गोंदिया येथे होणाऱ्या तीन दिवसीय हनुमंत कथेला प्रारंभ होण्यापूर्वी आज गोंदिया शहरात भव्य आणि भक्तिभावपूर्ण शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. माँ जगदंबा मंदिर, दुर्गा चौक येथून या शोभायात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रे दरम्यान शहर “जय श्रीराम” “जय हनुमान” च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. कथा वाचक वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

शोभायात्रा चांदणी चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक यासह शहरातील प्रमुख मार्गांवरून भ्रमण करीत श्री हनुमान मंदिर, सिव्हिल लाईन येथे भक्तिभावात समारोप करण्यात आला. फुलांच्या वर्षावासह, धार्मिक विधी व भक्तांच्या जयघोषात सद्गुरुजींचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेला प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गांनी भ्रमण करतांना ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावाने वातावरण अधिकच भक्तिरसाने न्हाऊन निघाले. शोभायात्रेत शेकडो कलसधारी, अश्वरथ, भगवे ध्वज, वाद्यवृंद आणि धार्मिक पद्धतीने सजवलेल्या रथांमुळे शोभायात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शोभायात्रेला कथेचे यजमान खासदार श्री प्रफुल पटेल, सौ वर्षाताई पटेल, माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आयोजन समितीचे सदस्य गण यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी व भक्तगण सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments