Wednesday, January 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोंदिया : जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी साईकिरण नंदाला, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी पोलीस बॅन्ड पथकाच्या सुमधुर गायनाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सर्व उपस्थितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*तहसिलदार समशेर पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण*

तहसिलदार समशेर पठाण यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, सर्वश्री नायब तहसिलदार प्रकाश तिवारी, जयंत सोनवाने, संजीव बारसागडे, बाबुलाल वरखडे यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच माजी सैनिक, वकील, अर्जनवीस व स्थानिक नागररिक उपस्थित होते. याप्रसंगी तहसिलदार समशेर पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल विवाह प्रतिबंध सामुहिक शपथ घेण्यात आली. तहसिलदार समशेर पठाण यांनी सर्व उपस्थितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments