गोंदिया : आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातून विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी येथील बस आगाराकडून 15 बसेसची सोय करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बसेसमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तर साकोली आगाराकडूनही बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेसद्वारे भाविकांना कचारगड येथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे. जेणेकरुन भाविकांची प्रवासासाठी गैरसोय होणार नाही, असे गोंदिया आगार व्यवस्थापक यतीश कटरे यांनी कळविले आहे.
असे आहे बसचे वेळापत्रक
गोंदियावरुन कचारगडसाठी : सकाळी 7.15 वाजता, सकाळी 8 वाजता, सकाळी 9 वाजता, सकाळी 9.45 वाजता, सकाळी 10 वाजता, सकाळी 11.30 वाजता, दुपारी 12.15 वाजता, दुपारी 12.45 वाजता, दुपारी 1.30 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 7.45 वाजता.
आमगाव येथून कचारगडसाठी : सकाळी 8 वाजता, सकाळी 8.45 वाजता, सकाळी 9.45 वाजता, सकाळी 10.30 वाजता, सकाळी 10.45 वाजता, दुपारी 12.15 वाजता, दुपारी 1 वाजता, दुपारी 1.30 वाजता, दुपारी 2.15 वाजता, दुपारी 2.45 वाजता, रात्री 8.30 वाजता.
सालेकसा येथून कचारगडसाठी : सकाळी 8.45 वाजता, सकाळी 9.30 वाजता, सकाळी 10.30 वाजता, सकाळी 11.15 वाजता, सकाळी 11.30 वाजता, दुपारी 1 वाजता, दुपारी 1.45 वाजता, दुपारी 2.15 वाजता, दुपारी 3 वाजता, दुपारी 3.30 वाजता, रात्री 9.30 वाजता.
कचारगड येथून परत येण्यासाठी
कचारगड येथून गोंदियासाठी : सकाळी 5.55 वाजता, सकाळी 10 वाजता, सकाळी 11.30 वाजता, सकाळी 11.45 वाजता, दुपारी 12.15, दुपारी 3 वाजता, दुपारी 3.30 वाजता, दुपारी 4 वाजता.
सालेकसा येथून गोंदियासाठी : सकाळी 6.10 वाजता, सकाळी 10.15 वाजता, सकाळी 11.45 वाजता, दुपारी 12 वाजता, दुपारी 12.45 वाजता, दुपारी 3.15 वाजता, दुपारी 3.45 वाजता, दुपारी 4.15 वाजता.
आमगाव येथून गोंदियासाठी : सकाळी 11 वाजता, दुपारी 12.30 वाजता, दुपारी 12.45 वाजता, दुपारी 1.15 वाजता, दुपारी 4 वाजता, दुपारी 4.30 वाजता, सायंकाळी 5 वाजता.
तसेच साकोलीवरुन कचारगडसाठी : सकाळी 7 वाजता व सकाळी 8 वाजता आणि कचारगडवरुन साकोलीसाठी : सकाळी 10.15 वाजता व सकाळी 10.45 वाजता.
कचारगड यात्रेसाठी बसेसचे वेळापत्रक जाहीर
RELATED ARTICLES






