पोलीस अधीक्षकांचे आव्हान : पाच मिनिटात चारली पथक पोहोचणार
गोंदिया : सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी गोंदिया पोलीस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी गोंदिया पोलिसांनी मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरु केली आहे. पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर 27 फेब्रुवारीपासून या योजनेला सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून शहरात कुठेही संशायास्पद आढळले तर त्वरित 112 डायल करा, चारली पथक पाच मिनिटात त्या ठिकाणी पोहोचणार, असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.
नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी. या उद्देशाने 112 या डायल ही योजना सुरु करण्यात आली. गोंदिया पोलिसांनी ही योजना 27 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी एका युवकाला देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली. त्याचा काही घातपात करण्याचा उद्देश असल्याचे समजून येत आहे. शहरात अशात अनेक घटना घडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे डायल 112 ही योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी शहरात कुणीही चाकू, बंदूक, तलवार धरून फिरताना आढळला तर त्वरित 112 या क्रमांकावर संपर्क करावे. शहरात दुचाकी वाहनावर दोन अंमलदार 24 तास सेवा देणार आहेत. याकरिता शहात पाच तुकड्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सेवेकरिता 35 पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी 112 या क्रमांकावर फोन लावल्यास पोलीस अंमलदार 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहचणार आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे व कुठेही संशयास्पद आढळले तर 112 हा क्रमांक डायल करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
नागरिकांनो कुठेही संशयास्पद आढळले तर करा 112 डायल
RELATED ARTICLES