गोंदिया : देवरी तालुक्याच्या पालादुंर/जमी या गावात अनेक वर्षांपासून अवैध व चिल्लर दारु विकनार्या रवी बोडगेवार उर्फ अन्ना (वय-५०) या ईसमाच्या घरात पोलिस व वनविभाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. त्या छाप्यात पोलिस व वनविभाच्या हाती वाघ, बिबट ,मांजर कुळातील वन्यप्राण्याचे दात, नख, अस्वलाचे नखे, रानडुक्कर सुळे, चितळाचे शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, जिवंत मोर, मोराचे पिस, रानगव्याचे शिंग, जाळे, सुकलेले हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, देशी दारु पेटी अंदाजे किंमत ८४,००० रुपये, रोख रक्कम- २१,४९,४४०/- सापडली.
आरोपीला अटक करत पोलिस व वनविभागातर्फे युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपासात आणखी चार आरोपी वनविभागाच्या हाती लागले. त्यात आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे, हे चारही राहणार मंगेझरी ता. देवरी, जी. गोंदिया यानां अटक करण्यात आले. तर या पाचही आरोपींना 27 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयाने 2 मार्चपर्यंत वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. जिल्ह्याभर ह्या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत असली तरी त्या साधारनसा दारु विक्रेत्याकडे लाखो रुपयांची रोकड व जंगली जनावरांचे अवशेष तांत्रीक कजलीचे की जंगली जनावरांच्या तस्करीचे हा प्रश्न संबंधित प्रशासनासह नागरिकांना पडू लागला आहे. या प्रकरणाचा तपास आता वनविभाग करित आहे.
ते पाचही आरोपी 2 मार्चपर्यंत वनविभागाच्या ताब्यात
RELATED ARTICLES