राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा तालुका अध्यक्षपदी माजी जि.प.सदस्य कैलाश पटले यांची नियुक्ती

0
236
  1. गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या आदेशाने तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले यांची नियुक्ती करण्यात आली.
    खासदार प्रफुलभाई पटेल यांचे कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जैन यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्ष मजबुतीकरिता कार्य करावे तसेच पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या. तिरोडा तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी कैलाश पटले यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.
    यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सोनूभाऊ पारधी, नाशिर घाणीवाला, राजेश तुरकर, वीरेंद्र इळपाते, ओम प्रकाश अंबुले, तरुण कनोजे, वासुदेव वैद्य, भूमेश्वर शेंडे, राजेशकुमार तायवाडे पत्रकार व मीडिया प्रमुख राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, आरिफ़ पठाण, आशिष चौधरी, होमेंद्र चौधरी, सुरेंद्र लिंल्हारे, ताराचंद नखाते, अशोक पटले सहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here