Friday, September 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedब्रेकिंग न्यूज; 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व अमानुष अत्याचार करून हत्या

ब्रेकिंग न्यूज; 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व अमानुष अत्याचार करून हत्या

देवरी तालुक्यातील गोटाणपार येथील दुर्दैवी घटना
गोंदिया : देवरी तालुक्यातील ककोडी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोटानपार येथे ता.१९ रोजी लग्नकार्यात आलेल्या १२ वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमाणूस अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना आज ता.२० रोजी समोर आली आहे. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला असून आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागनी होत आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा गोटानपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोटानपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे  ता. १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता लग्न आयोजित करण्यात आले होते. याच लग्नात अवघ्या सहाव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन बारा वर्षीय मुलगीही लग्न सोहळ्यात आलेली  होती त्याचवेळी अंधाराचा फायदा घेवून नराधमांनी त्या चिमूकलीच अपहरण करून गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला. व डोक्यावर जबर मारहाण करून हत्या केल्याची विदारक घटना समोर आली आहे.

घडलेल्या घटना क्रमावरून ही घटना सामूहिकरीत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे घटनेचा तपास चिचगड पोलीस स्टेशन करत असून अजून पर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घडलेली घटना अतिशय माणूस व दुर्दैवी असून ताबडतोब आरोपींना अटक करून शिक्षा करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. सदर घटना ठिकानी पोहचुन चिचगड पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments