अनोळखी व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरु

0
285

गोंदिया  : 1 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे स्टेशन गोंदिया येथील मेन गेट जवळ एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 ते 60 वर्ष हा अचेत अवस्थेत दिसून आल्याने रेल्वे वैद्यकीय अधिकारी गोंदिया यांनी तपासून मृत घोषित केले व स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन गोंदिया व रेल्वे डॉक्टर यांचे मेमोवरुन रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथे अ.मृ.नं. 8/2024 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला आहे. नमूद अनोळखी मृत व्यक्तीचे नाव, गाव तसेच नातेवाईकांचा शोध घेतला असता आतापर्यंत कोणतीच माहिती मिळालेली नाही.
अनोळखी पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. वय- अंदाजे 55 ते 60 वर्षे, उंची- 5 फुट 5 इंच, चेहरा- लांब, बांधा- साधारण, डोक्याचे केस- पांढरे/काळे, नेसनीस- काळ्या रंगाचे स्वेटर व पांढऱ्या रंगाचे शर्ट तसेच लाल पट्टे असलेली चादर, गोंदन- उजव्या हातावर ‘ऊ’ असे गोंदलेले. तरी अशाप्रकारचे वर्णन असलेले अनोळखी पुरुष कोणाचे नातेवाईक असल्यास त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे संपर्क साधावा. असे रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथील तपास अधिकारी नंदा माने यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here