शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यां 2 भावडांना 20 जूनपर्यंत कोठडी

0
272

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपयाने फसवणूक करणाऱ्या दोन भावांच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8 टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी अनेक लोकांना लुटले. सुरवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.या प्रकरणात आमगाव शहरातील बनिया मोहल्ला येथील किसन चंपालाल पांडे (वय 21) व कन्हैयालाल चंपालाल पांडे (वय 24) या दोन्ही भावडांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8 टक्के प्रमाणे प्रतिमहिना परतावा ( रिटर्न ) देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या ( 58 ) यांच्याकडून 1 कोटी 35 लाख घेऊन त्यांना 50 लाख रुपये परत केले.तर उर्वरित 85 लाख रुपयाचे चेक दिल्याची माहिती दिली. १ मे च्या तारखेतील चेक होते.आरोपीच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी वाद घालून पूर्ण पैसे दिले आहेत असे सांगून घरातून बाहेर काढल्याची माहिती तक्रारदाराने दिली.तक्रारदार यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकी करिता दिले होते.आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7 टक्के दराने व्याज देऊ, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमैय्या तयार झाले नाहीत.परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 2012 पासून तक्रारदार यांच्याकडून आरोपींनी 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेऊन सदर रकमेची अफरातफर केली आहे. फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावांवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 418, 403, 406, 120 (ब) अन्वये गुन्हा 13 जून रोजी दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here