गोंदिया : मागील ३ वर्षापासून सातत्याने गोंदिया विधानसभा मतदारसंघातील आ.विनोद अग्रवाल हे आमदार झाल्यासपासून त्यांनी डांगोरलीचे बंधाराच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पासून सध्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांचे पर्यन्त पाठपुरावा करुन शेतक-यांचे तसेच शहरवासियांची पाण्याची समस्या करण्यासाठी केलेल्या प्रयत्नना यश प्राप्त झाले आहे.
तेढवा जवळील वाघ नदीवर डांगोरर्ली बॅरेजचे बांधकाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या मान्यतेने करण्यात येणार असून यामुळे तेढवा-सिवनी आणि नवेगाव-देवरी व डांगोरली उपसा सिंचन योजनांना बळकटी मिळणार आहे. याचा फायदा पाणी साठवण आणि शेतजमिनीला होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त पाणी आणि गोंदिया शहराच्या पिण्याच्या पाण्याचे समस्यांचे निराकरण करता येणार. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता व बंधा-याच्या कामाला महाराष्ट्र राज्य जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ चे कलम ११९(च) अन्वये दि.२४/०८/२०२२ रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली होती. तसेच पुढील टप्यामध्ये डांगोरली बंधा-याची शासनाकडून प्रशासकीय मान्यता करीता राज्य तांत्रिक सल्लागार समितिची मान्यता प्राप्त झालेली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता होऊन निविदा प्रकिया सुरू होणार आहे. याकरीता आ.विनोद अग्रवाल यांनी राज्यसरकारचे मनापासून आभार व्यक्त ही केले आहे. लवकरच पाण्याची समस्यापासून शेतक-यांना तसेच गोंदिया शहरवासीयाना सुटका मिळणार आहे.