गोंदिया : आमगाव तालुक्यातील पदमपुर येथील प्रवीण हेमराज लांजेवार वय १३ वर्ष रा. पदमपुर हा आपल्या आई सोबत शेळ्या चालण्याकरिता गेला असता त्यांनी आपल्या आईला म्हटले की मी नदी वरून आंघोळ करून येतो परंतु तो काही वेळ पर्यंत परत आला नसल्याने त्याची आई नदीकडे त्याला पाहायला गेली असता त्याचे कपडे व चप्पल नदीकाठी ठेवलेली होती व तो कुठेही दिसला नाही. तेव्हा त्याची आई घाबरली व आजूबाजूला शेतात असलेल्या काही लोकांना बोलावले व नंतर घरच्या लोकांना माहिती दिली तेव्हा त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली व त्याला नदीत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुठेही दिसला नाही. अखेर पोलिसांनी सावंगी येथील राजकुमार भगत व यांची चमू गोताखोरांना प्राचारण करण्यात आले. तेव्हा सावंगी चे राजकुमार भगत व यांची चमू नी शोध मोहीम सुरू केली तेव्हा काही तासातच प्रवीणचा मृत्यूदेह घटनेच्या काही अंतरावर सापडला. मृतकाचा मृत्यूदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच. एम. रहांगडाले करीत आहेत. घटनास्थळी नायब तहसीलदार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश वेलादी, पोलीस कर्मचारी नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिकांनी शोध मोहिमेत सहकार्य केले.
अखेर त्या १३ वर्षीय प्रवीणच्या मृत्यूदेह सापडला
RELATED ARTICLES