प्रॉजेक्ट मॅनेजर व जी.एम.जाकिर शिद्दिकी यांची लापरवाही
गोंंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर सडक अर्जुनी तालुक्यातून कोहमार ते शिरपूर,मासुलकसा घाट शासीकरण मोहघाठा जंगल या ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम प्रगती पथावर असून, या उड्डाण पुल बांधकाम कामाचा कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला आहे. परंतु, या बांधकामामुळे वाहतूकीसाठी साईड ने केलेला रस्ता पूर्णतः उखडलेला असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे धुळच धूळ तयार झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून लहान मोठे वाहतूक धारक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या रस्त्यावर दोन वर्षात कितेक तरी प्रवाशाचा अपघात झाला तर, याची जबाबदारी अग्रवाल ग्लोबल कंपनी घेईल का?. असा सवाल प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे . व अग्रवाल कंपनी च्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. कर्मच्याच्या भ्रमणध्वनी वरून वारंवार लक्षात आणून दिला. तरीपण कंपनीच्या प्रॉजेक्ट मॅनेजर.डी.पी.एम यांची मनमर्जी कारभार सुरूच आहे. यावरून कंपनीवर वचक कोणाचा?. असा सवाल प्रवाशांच्या मनात घर करून उभा आहे.
सविस्तर असे की, देवरी . कोहमारा शहरावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 जात असून, तालुक्यातील मासुलकसा घाट आणि शिरपूरबांध ससीकारण घाट . मोहघाठा या ठिकाणी उडान पुलाचे काम सध्या कासव गतीने सुरू आहे. या चारही उडान पुल बांधकामाचा कंत्राट शासनाने अग्रवाल ग्लोबल कंपनीला दिला आहे. या उडान पुलाच्या बांधकामामुळे पुलाच्या जवळील कंपनीने वाहतुकीसाठी एकेरी रस्ता बनवून दिला आहे. या रस्त्यावरून लहान-मोठे जड वाहन, टू व्हीलर ,फोर व्हीलर असे रात्रंदिवस असंख्य वाहन धावत असतात.
या रस्त्यावरून रात्रंदिवस असंख्य वाहन धावत असल्यामुळे, या एकेरी रस्त्याची अवस्था खूप दयनीय झाली असून, मोठमोठे खड्डे. धुळ निर्माण झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, पावसाळ्याच्या पाण्याने हे खड्डे भरून जात असतात. पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे खड्ड्यांचा अंदाज प्रवाशांना समजून येत नाही. शिरपूर बांध आणि मासुलकसा घाट या दोन्ही ठिकाणातील उडान पूल जवळील रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच या खड्ड्यांमुळे आणि एकेरी रस्त्यामुळे दररोज तासंतास लहान मोठ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे प्रवासी कंपनीच्या मनमर्जीपणामुळे वैतागून गेले आहेत.तसेच रस्त्यावर पाणी नसलं तर, धुळीमुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो.
या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी लोक जीव टांगणीला घेऊन प्रवास करीत असतात. परंतु अग्रवाल ग्लोबल कंपनी या खड्ड्यांना बुजवत सुद्धा नाही. या खड्ड्यांमुळे जर एखाद्या प्रवाशाचा अपघात झाला तर, कंपनी याची जबाबदारी घेईल का?. असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. आपल्या मनमर्जीपणामुळे कंपनी प्रवाशांच्या जीव धोक्यात घालत आहे. अशा या कंपनीवर वचक कोणाचा?. असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
जी.एम.जाकीर शिदिकी
कंपनी मटेरियल वक्त पर देती नाही तो हम क्या करेगे पाणी की तेंकर ब्रेकडाऊन है.
*महेश डुंभरे युवा सेना जिल्हा प्रमुख गोंदिया*
जी.एम.जाकिर शिधिकि. प्रॉजेक्ट मॅनेजर व विपीन श्रीवास्तव यांच्या लापरवाही मूळे ह्या रस्त्याची ऐसी तैसी झाली खड्डे मोठे मोठे. धूळ ही धूळ. जाम लागतो 2 ते 3 तास लांबच लांब पैसे कमवण्याच्या नादात रोड कडे कंपनी चां दुर्लक्ष झालं आहे.