Wednesday, April 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedअफवांवर विश्वास ठेवू नका, मी काँग्रेसमध्येच - आमदार कोरोटे यांचा खुलासा

अफवांवर विश्वास ठेवू नका, मी काँग्रेसमध्येच – आमदार कोरोटे यांचा खुलासा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला वातावरण अतिशय पोषक आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, मी काँग्रेसमध्येच आहो, असे मत आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहषराम कोरेटे यांनी आज सोमवार,(ता.१२ फेब्रुवारी ) रोजी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केले.
आमदार कोरोटे यांच्या मते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यातून काहीतरी खोडसाळपणा होत आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक आहे.मला काँग्रेसने जे दिले ते मी विसरु शकत नाही. आमचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, गांधी परिवार, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत. अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याचा व भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून वृत्त पूर्णपणे निराधार आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीविरोधात वातावरण असून तो दाबण्यासाठी विविध प्रकारचे षडयंत्र रचले जात असल्याची प्रतिक्रिया आमदार सहषराम कोरेटे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments