Tuesday, October 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedअभियंते व पेटी कंत्राटदारात संगनमत:सिमेंट रस्ता बांधकामाचा दर्जा निकृष्ठ

अभियंते व पेटी कंत्राटदारात संगनमत:सिमेंट रस्ता बांधकामाचा दर्जा निकृष्ठ

गोंदिया : जिल्हयातील सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे चित्र बघावयास मिळते.जिल्हा परिषदेच्या 2515,3054,2419 आदिवासी उपाययोजना,ठक्करबापा योजनेसह,मग्रारोहयो योजनेंंतर्गत रस्ता बांधकाम हाती घेण्यात आले आहे.या रस्ता बांंधकामाची एजंसी जरी ग्रामपंचायत असली तरी सदरचे काम हे अभियंता ग्रामपंचायत पदाधिकार्यांना हाताशी धरुन कंत्राटदारासोबत करीत असल्याचेही गोंंदिया व गोरेगाव तालुक्यात निदर्शनास आले आहे.जून महिन्यापासून पावसाला सुरवात झाली असून सिमेंटरस्ता तयार करतांना योग्यप्रकारच्या ओपीसी सिमेंटचा वापर न करता पीपीसी सिमेंटचा वापर केले जात असल्याचेही चित्र आहे.या सर्व कामाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असून जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या पारदर्शकतेचा गोडवा गातात त्या या कामाची सखोल चौकशी करतील काय अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोंंदिया तालुक्यातील चुलोद येथे जि.प.बांधकाम विभागाच्यावतीने 2515 योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे.या बांधकामाला आठवडा सुुध्दा व्हायला असून निकृष्ठ बांधकामामुळे आत्तापासूनच भेगा पडल्याचे व किनारही तु़टले गेले,तरीही काम बघणारा अभियंता मात्र सर्वोतकृष्ठ काम असल्याची ग्वाही देत आहेत.विशेष म्हणजे सदर रस्ता बांधकाम हे गोंदियाचे आमदारांचे समर्थक व बाजार समितीचे संंचालक असलेल्या व्यक्तीने केले असून आम्ही कसेही काम केले तरी काही फरक पडत नसल्याचेही सांगायला ते विसरत नाही.अशीच अवस्था तालुक्यातीलच गर्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे तयार करण्यात आलेल्या रस्त्याची असून सदर रस्ता बांधकामावर वापरलेला सिमेंट कधी तयार करण्यात आला याचाही उल्लेख नाही,अशाप्रकारे सिमेंट वापरुन रस्त्याचे बांधकाम होत आहे.तालुक्यातीलच गिरोला येथेही नुकतेच सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून महिना सुध्दा लोटायला असताना त्या सिमेंटरस्त्यात वापरलेली गिट्टी वर आल्याचे बघावयास मिळते. सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी व्हावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे बांधकाम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कामाची पाहणी करायला हवे होते,मात्र काम सुरु असतांना अभियंते फिरकलेच नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. मग्रारोहयो(अभिसरण) योजनेंतर्गत चुटीया येथे काम सुरु असून त्या कामाची गुणवत्ता तिसर्या पक्षाकडून निष्पक्ष तपासण्यासारखी असतानाही मग्रारोहयोचे अभियंते मात्र काम चांगला असल्याची बतावणी करुन पेटी कंत्राटदाराची बाजू घेत साटेलोटे करीत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातीलच नवेगाव कला येथे सुध्दा गेल्या एक महिन्यापुर्वीच तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता फुटायला लागला आहे.सिमेंट रस्ता कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे.त्याचबरोबर खडी उखडून रस्त्यावर येऊ लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याची सुध्दा कंत्राटदारासोबतच चौकशीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments