मा.ना.श्री देवेंद्र फडणविसजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना खा. श्री प्रफुल पटेल यांनी दिले निवेदन
गोंदिया : 8 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा व शेतकऱ्यांना डीबीटी च्या माध्यमातून 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्याबाबदचे निवेदन देऊन मा.खा. श्री प्रफुल पटेल यांनी मा.ना. श्री देवेंद्र फडणविसजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
मागील काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे धानपिक, धानाच्या कडपा तसेच शेतात असलेले पुजन्यांना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतात असलेल्या कडधान्याच्या पीकाचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा यावर्षी लागणारा मशागतीचा वाढीव खर्च लक्षात घेता डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्यात यावी यासंबंधी मा.खा. प्रफुल पटेल यांनी मा. ना. देवेंद्र फडणविसजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. यांना निवेदन दिले. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, श्री सुनील फुंडे, अध्यक्ष, बिडीसीसी उपस्थित होते.