विशेष पथकाची कारवाई : 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : तालुक्यातील लेंडेझरी नहर येथे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचून दुचाकीने अवैैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाºयाला पकडले. ही कारवाई 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्याच्याकडून 50 लिटर मोहफुल दारू व एक दुचाकी असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैधरित्या चालणाºया धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याकरिता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची जिल्ह्यात अवैध धंद्यांविरूद्ध विशेष धाड मोहीम सुरू आहे. दरम्यान, विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गंगाझरी पोलिस ठाणे परिसररातील लेंडेझरी नहर येथे सापळा रचून 6 फेब्रुवारी रोजी 8.15 वाजताच्या सुमारास एमएच 35/ एएक 6906 क्रमांकाच्या मोटारसायकलने हातभट्टी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना पकडले. यावेळी 50 लिटर मोहफुलाची दारू किंमत 10 हजार रुपये, एक मोटारसायकल किंमत 60 हजार रुपये असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी महेंद्र रमेश ताराम (31) रा. लेंडेझरी, ता. गोरेगाव याच्याविरूद्ध गंगाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास गंगाझरी पोलिस करीत आहेत.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219