दोन इसमांविरूद्ध गुन्हा दाखल : गंगाझरी पोलिसांची कारवाई
गोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार 23 एप्रिल रोजी सकाळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सकाळी 8.55 वा. चे सुमारास मौजा बोरा येथील सोनेगावकला रस्त्यावर, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इसमास महिंद्रा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अतुल शामराव सोयाम, वय 20 वर्षे, रा. परसवाडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया व मालक श्रीकांत श्रीराम ढबाले, वय 45 वर्ष, रा. परसवाडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे गुन्हा नोंदविण्यात आला. एक महिंद्रा ट्रॅक्टर क्र. MH 35 G 5713 (ट्रॉलीसह) किंमत 04 लाख 50 हजार रु. व त्यामध्ये रेती 1 ब्रास रेती किंमत 06 हजार रु. एकूण किंमत 4 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. श्री. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गंगाझरी येथील पोहवा राकेश भुरे, पोना महेंद्र कटरे, पोना हरीश कटरे, पोना नागपुरे, पोना राऊत, चापोशि अतरे यांनी केलेली आहे.
अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी 4.56 लाखांचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES